शब्द शब्द सांगते भाषा आहे माझी मराठी 'आई 'आणि 'बाबा' ह्या दोन गोंड शब्दांपासून बोलायला शिकविते मराठी असे आमुची मायबोली. लेखकानों💕 सुप्रभात मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो. सर्वांना जागतिक मराठी भाषादिनाच्या खुप शुभेच्छा. संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझा मराठीची बोलू कौतुके,परी अमृतातेही पैजा जिंके. ही क्षमता आहे मराठी भाषेची. चला,आज आपल्या माय मराठीविषयी चार ओळी लिहुया.