उन्हाळा थंडगार वार्याची झूळूक कुठे गेली गरम गरम हवेने भूमीही तप्त झाली चिंब भिजण्याची आस पाखराला थंडगार वारा सांगा कुठे गेला करपली पाने वाढला उन्हाळा दाहीदिशा धावे मृग मृगजळा अंग सारे झाले घामाघूम व्याकूळ झाला जीव तहानेन पाण्यासाठी झाली सूरू वणवण आटल्या विहिरी तलाव पाण्यावीण आहे ते पाणी वापरा जपून पाणी आहे जीवन अमृतासमान पंखा लावुनीही गरम हवा येते लाईट गेल्यावर घालमेल होते कोकम सरबत ज्युस लस्सी थंडावा लिंबूपाणी थंड हवा गारवा थंडगार सावली गुरे शोधू लागली झुळझुळ झर्यालाही किंमत आली द्रोणपाणी भरूनी ठेव पाखराला पाणीदान करूनी जप मानवतेला उन्हाळा