Nojoto: Largest Storytelling Platform

*गोधडी* .... *सुखं_दुःखाची ठिगळं* *कर्म बंधनाचा

*गोधडी* ....
 *सुखं_दुःखाची ठिगळं* 
 *कर्म बंधनाचा धागा* 
 *माय गोधडी सांधते* 
 *उब मिळो साऱ्या जगा..* 

 *एका एका चिंधीमधी* 
 *आठवणींचा फुलोरा* 
 *हात फिरता अलवार* 
 *लख्ख दर्पण सामोरा..* 

 *आज पावलो पावली* 
 *उन्हं सलतं विखारी* 
 *उबदार गोधडीची* 
 *वीण जुळते अंतरी..* 

 *खोल मनाच्या कुपीत* 
 *भाव पोरका तरतो* 
 *गोधडीला बिलगून* 
 *डोळां श्रावण झरतो..* 

 *माय तुझ्याच कुशीचा* 
 *भांबावल्या जीवां आंस* 
 *किती हंबरं वासरू* 
 *आता नुसताच भास..* 

 *तुझं स्नेह पांघरून* 
 *गोधडीचं हे चांदणं* 
 *काट्या _कुटेरी जगात* 
 *मऊ मखमली शिंपण..*

©Shankar Kamble #गोधडी #उब #आई #प्रेम #आईवडील #पांघरून #लेकरू #

#maa
*गोधडी* ....
 *सुखं_दुःखाची ठिगळं* 
 *कर्म बंधनाचा धागा* 
 *माय गोधडी सांधते* 
 *उब मिळो साऱ्या जगा..* 

 *एका एका चिंधीमधी* 
 *आठवणींचा फुलोरा* 
 *हात फिरता अलवार* 
 *लख्ख दर्पण सामोरा..* 

 *आज पावलो पावली* 
 *उन्हं सलतं विखारी* 
 *उबदार गोधडीची* 
 *वीण जुळते अंतरी..* 

 *खोल मनाच्या कुपीत* 
 *भाव पोरका तरतो* 
 *गोधडीला बिलगून* 
 *डोळां श्रावण झरतो..* 

 *माय तुझ्याच कुशीचा* 
 *भांबावल्या जीवां आंस* 
 *किती हंबरं वासरू* 
 *आता नुसताच भास..* 

 *तुझं स्नेह पांघरून* 
 *गोधडीचं हे चांदणं* 
 *काट्या _कुटेरी जगात* 
 *मऊ मखमली शिंपण..*

©Shankar Kamble #गोधडी #उब #आई #प्रेम #आईवडील #पांघरून #लेकरू #

#maa