देवा,तू प्रत्येकास सर्वकाही देतोस जे जे ते मागतात, मग रस्त्यावर फिरताना लहान लहान मुले भीक मागताना का दिसतात. तूच तारणहार देवा तूच सर्वांचा रखवाला, तुझ्याशिवाय कुणाजवळ गाऱ्हाणे देणे आम्हाला. देवा,का असा छळत राहतोस, पदोपदी मरणयातना देत राहतोस. गुन्हा काय देवा ते तर सांगावे, असेच जीव तोडत कितपत जगावे. डोळे भरून येतात देवा,पाहवत नाही असे दिनदुबळ्यांचे हाल नि जगणे, कृपा कर त्यांच्यावर असा अंत नको पाहू,हेच माझे मागणे. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों तुम्ही दिलेले विषय आम्ही नेहमीच देत असतो हा विषय त्यातलाचं आहे. हा विषय आहे Kranti Shelar यांचा. देवा अंत नको पाहू.. #देवाअंतनकोपाहू चला तर मग लिहुया.