Nojoto: Largest Storytelling Platform

लहानपणी भातुकली खेळताना, खोटं खोटं जेवण, ऑफिस ला ज

 लहानपणी भातुकली खेळताना, खोटं खोटं जेवण, ऑफिस ला जाणं, परत येणं...स्वतःच्या कल्पनेने सारं उभं करायचो, खेळायचो आणि आवरून ठेवायचो सगळं...कल्पनेतल्या जगात वावरायची..तीच सवय पुढेही तशीच राहते.. कायमची...जो सर्वशक्तिमान, सर्वसमावेशक, सर्वत्र कायम अस्तित्वात आहे, त्याला त्यानेच निर्माण केलेल्या पृथ्वीवर पाहुणा म्हणून बोलावतो आपण, आपल्याला आवडणारे पदार्थ त्याच्यासमोर नैवेद्य म्हणून ठेवतो, आपणंच आपल्या मनात ठरवलेलं रूप देऊन त्याच्या लहान मोठ्या प्रतिमा घडवतो आणि पूजन करतो. त्याच्या समोर त्याच्या महानतेचा पाढा रोज सकाळ संध्याकाळ गातो. नंतर त्या प्रतिमेचं विसर्जन करतो...बाप्पा सारं पहात असतो..गालात हळूच हसत असतो..जसं लहानपणी आपली भातुकली पाहून आपले आई-बाबा पाहत होते ना, अगदी तसंच...शैलेश हिंदळेकर