Nojoto: Largest Storytelling Platform

ते तिचं पहिलं प्रेम होतं ! संध्याकाळची वेळ होती..

ते तिचं पहिलं प्रेम होतं !

संध्याकाळची वेळ होती..
तिच्या जुन्या डायरीला कवटाळून , आरामखुर्चीत ती बसली होती.
डायरी उघडताच डोळ्यासमोर उभे राहिले ते दिवस..
त्या प्रत्येक दिवसाच्या आठवणीत ती जरा जास्तच रमायला लागली होती.

बघता बघता पानं उलटत..
तिच्या हाती लागलं ते पिंपळाच पान ,
त्या पानाला हातात घेताच एका खास चेह-यानी रेखाटली तिच्या आठवणींची कमान.

पिंपळपानाच्या जाळीत आठवले तिला ते दिवस..भेटीचे,
ज्यावेळी कडक ऊन्हातही अनुभव मिळायचे श्रावण सरींचे..
त्यावेळी आरसा तिचा खूप जवळचा सखा होता ,
न चुकता अजूनही वेणीत केसांच्या रोज तो चाफा मात्र माळला जात होता.

त्याकाळी रोज रोज भेट व्हायची ..
भेटल्यावर दोघांच्याही आनंदाला पार नाही उरायचा,
ती कधी चिडलेली असली तरी ,तो मात्र दररोज तिच्याकडे पाहून हसायचा.

सकाळ आणि संध्याकाळ रोज ती त्याला भेटायला जायची आणि ,
तिला भेटायचं  म्हणून हा सुद्धा घाई करायचा आवरायची.

तो काहीही न बोलता सगळं नीट तिला समजवायचा..
आणि ही एवढं बोलायची की हिचं ऐकण्यातच त्यांच्या भेटीचा क्षण संपून जायचा.

तिच्या हर एक लहान-सहान गोष्टी ती त्याला सांगायची ,
कधी फारच विचारात गुंतली असेल तर तिच्या फक्त डोळ्यांतल्या पाण्यानं त्याला ती उमगायची.

त्याच्या भेटण्याने तिच्या चेह-यावर प्रत्येकवेळी एक नवी चमक यायची ,
तो कुठे जरी असेल तरी केवळ त्याच्या आभासाने ती खुदकन गालात हसायची.

एके दिवशी झालं काय,
त्याचं येणं राहून गेलं..
रुसून बसली ती ; म्हणे मग मला तरी का बोलवलं ?
पावसाच्या सरीत ओलीचिंब एकटीच बडबडत बसलेली ,
शेवटी आलाच बरं का तो ..
विचारायला का गं तु रुसलेली ?

रुसवा तिचा काढायला त्याचं येणंच पूरे झालं,
आणि खूप वेळानी दिसलो म्हणून दोघांच डोळ्यांत हरवणं झालं .

पावसाचा जोर वाढला म्हणून 
दोघांनी एका झाडाचा आधार घेतला होता..
पिंपळाच्याच त्या झाडाखाली त्यानं तिच्या वेणीत चाफा माळला होता.

सोसाट्याचा वारा सुटला आणि 
खिडकी धाडकन आदळली ..
आठवणींच्या त्या कमानीवरुन हिची नजर 
पुन्हा त्या पिंपळपानाच्या जाळीवर येऊन विसावली.

आभासाने त्याच्या आजही तिचं 
सौंदर्य तितकचं खुललेलं असतं..
कारण काहीही झालं तरी 
ते..तिचं पहिलं प्रेम होतं 
ते..तिचं पहिलं प्रेम होतं !!

-साक्षी साळुंखे
(सातारा) #fisrtlove