Nojoto: Largest Storytelling Platform

महामानवाचा वसा घेउनी संघर्ष करुनि लढले ते लाथाडुन

महामानवाचा वसा घेउनी 
संघर्ष करुनि लढले ते
लाथाडुनी सामाजिक विषमता 
हक्कासाठी झगडले ते 

कष्टकऱ्यांचे हाल पाहुनी 
न्यायासाठी भांडले ते  
महाराष्ट्र अखंडित राहण्या 
चळवळीत स्वतः सांडले ते  

रचुनी संघर्षमयी साहित्य 
लेखणीचे खरे बादशहा ठरले ते  
असे माझे लोकशाहीर अण्णा 
साहित्यरत्न म्हणून उरले ते 

सलाम त्यांच्या या कर्तुत्वाला 
अभिवादन करते जयंतीदिनी
मनुवाद्यांनी शिकू नाही दिले त्यांना, 
पण अजरामर झाली त्यांची लेखणी 

ज्योती किरण किरतकुडवे (साबळे)

©Jk #1Aug 
#lokshahir 
#Annabhausathe
महामानवाचा वसा घेउनी 
संघर्ष करुनि लढले ते
लाथाडुनी सामाजिक विषमता 
हक्कासाठी झगडले ते 

कष्टकऱ्यांचे हाल पाहुनी 
न्यायासाठी भांडले ते  
महाराष्ट्र अखंडित राहण्या 
चळवळीत स्वतः सांडले ते  

रचुनी संघर्षमयी साहित्य 
लेखणीचे खरे बादशहा ठरले ते  
असे माझे लोकशाहीर अण्णा 
साहित्यरत्न म्हणून उरले ते 

सलाम त्यांच्या या कर्तुत्वाला 
अभिवादन करते जयंतीदिनी
मनुवाद्यांनी शिकू नाही दिले त्यांना, 
पण अजरामर झाली त्यांची लेखणी 

ज्योती किरण किरतकुडवे (साबळे)

©Jk #1Aug 
#lokshahir 
#Annabhausathe
jyotikiratkudve6114

Jk

Bronze Star
New Creator